यंदाच्या निवडणुकीत अंदाजे ११ अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या अंदाजापेक्षाही अधिक खर्च म्हणजे जवळपास १४ अब्ज डॉलर खर्च होणार असल्याचे ‘द सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’ने म्हटले आहे. या निवडणुकीने आधीच्या निवडणूक खर्चाचे विक्रम मोडीत काढले आहेत. ‘द सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’ नुसार, डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासात देणगीदारांकडून एक अब्ज डॉलर्स देणगी मिळवणारे पहिले उमेदवार ठरले आहेत.
वाचा:
बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेला १४ ऑक्टोबर रोजी ९३.८ कोटी डॉलर्स मिळाले होते. त्यामुळे डेमोक्रॅटीक पक्षाच्या सदस्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी देणगीदारांकडून ५९.६ कोटी डॉलर्स निवडणूक प्रचारासाठी जमवले आहेत. करोना महासाथीच्या आजाराचा काळ असला तरी अनेकजण २०२०च्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते अब्जाधीशांचा समावेश आहे.
वाचा:
यंदाच्या निवडणूक देणगीत महिलांनी सर्वाधिक देणगी दिली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी प्रचारात जोर लावला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. सध्या पोस्टल, ई-मेलद्वारे मतदान सुरू असून मोठ्या प्रमाणांवर पोस्टल, ई-मेल मतदान करण्यात आले आहे. त्याशिवाय तीन नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times