मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता कामगार व उत्पादन शुल्क मंत्री यांनाही करोनाने गाठले आहे. वळसे-पाटील यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दैनंदिन कामकाजासाठी आज सकाळीच ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतल्याचे समजते. तसंच, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाच्या सोहळ्याला वळसे-पाटील उपस्थित राहिले होते. त्यामुळं चिंता वाढली आहे. ( tests covid positive)

वळसे-पाटील यांनी स्वत: ट्वीट करून संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ‘नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ‘आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

दिलीप वळसे-पाटील हे आज सकाळी मंत्रालयात उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच करोना चाचणीचा अहवाल आल्याने ते घरी निघून गेले. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. वळसे-पाटील हे मागील आठवड्यात झालेल्या खडसे यांच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. तिथं ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळं अन्य नेत्यांनाही त्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागणार आहे.

वाचा:

अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातील बहुतेकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या करोनावर उपचार घेत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here