मुंबई: महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. १ ते ३० नोव्हेंबर असा लॉकडाऊनचा सहावा टप्पा असणार आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. ( Latest News Updates )

वाचा:

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध गेल्या काही महिन्यांत शिथील करण्यात आले आहेत. विविध सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. या सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरू असताना दुसरीकडे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र कठोरपणे लॉकडाऊनचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाचा:

देशात आधीच ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉकच्या सहाव्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्या निर्णयाला अनुसरूनच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. नोव्हेंबर महिन्यात असून या काळात गर्दी वाढून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ती बाब ध्यानात घेऊन सरकार अनलॉकच्या बाबतीत सावधपणे पावले टाकत असल्याचेच या निर्णयावरून दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here