इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताच्या कारवाई करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण आणि पाठबळ दिले जाते. दहशतवादाचे आम्हीच बळी असल्याचे पाकिस्तान जगाला सांगत असले तरी त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. पुलवामा हल्ल्याबाबतचा खुलासा पाकिस्तानच्या मंत्र्याने केला आहे. पुलवामा हे इम्रान खानच्या सरकारचे मोठे यश असल्याचा दावा पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केला.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत गुरुवारी चर्चेत सहभागी झाले असताना हे वक्तव्य केले आहे. हा इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान सरकारचे मोठे यश आहे. फवाद चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा:

पाकिस्तानचे खासदार अय्याज सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याच्या मुद्यावरून पाकिस्तान सरकारवर जोरदार हल्ला बोल केला होता. पाकिस्तान सरकार भारताच्या हल्ल्याला घाबरले होते, असाही दावा त्यांनी केला. त्याला उत्तर देताना फवाद चौधरी यांनी सरकार भारताला उत्तर देण्यास भक्कम असल्याचे म्हटले. भारताने नव्हे तर पाकिस्तानने भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारले. पुलवामा तर मोठे यशच असल्याचे फवाद यांनी सांगितले.

वाचा:

वाचा:

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्धवस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here