मुंबई : ‘एल अँड टी’च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले आहे. हे आतापर्यंत देशात देण्यात आलेले सर्वात मोठे ईपीसी कंत्राट असून या अशाप्रकारच्या पहिल्याच प्रकल्पात मुंबई-अहमदाबाद हाय- स्पीड रेल्वे प्रकल्पाचा भाग असलेल्या २३७.१ कि.मी लांबीच्या एमएएचएसआर सी-४ पॅकेज बांधकामाचा समावेश आहे.

एमएएचएसआर- सी-४ पॅकेजच्या कामात व्हायाडक्ट्स, स्थानके, प्रमुख नद्यांवरील पूल, डेपो आणि इतर पूरक कामांचा समावेश आहे. या अंदाजे ५० किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय- स्पीड रेल्वे प्रकल्पाला एमएएचएसआर प्रकल्प असेही नाव असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १५५.७६ कि.मी, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील ४.३ कि.मी आणि गुजरात राज्यातील ३४८. ०४ कि.मी, रेल्वे मार्गावरील १२ स्थानकांच्या बांधकामाचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाय- स्पीड रेल्वे ताशी ३२० कि.मी च्या वेगाने संपूर्ण अंतर मर्यादित थांब्यासह अवघ्या २ तासांत तर सर्व थांब्यांसह केवळ तीन तासांत पूर्ण करेल.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्र्हमण्यन म्हणाले, ‘महामारीच्या या अनिश्चित काळात अशाप्रकारच्या भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम मिळणे हे केवळ बांधकाम क्षेत्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण पायाभूत सुविधा उद्येगासाठी दिलासादायक आहे. हा भारत सरकार, भारतीय रेल्वे बोर्ड आणि एनएचआरसीएलचा अतिशय धाडसी निर्णय आहे. यामुळे अशाप्रकारच्या इतर प्रकल्पांना देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी जोडण्यास आणि व्यवसाय करण्यास, प्रवासाचा वेळ कमी करण्यास आणि आर्थिक पुनरूज्जीवन व उपक्रमांच्या दृष्टीने बदलाचा प्रवर्तक ठरण्यास चालना मिळेल. परत एकदा, एल अँड टीला राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाचा भाग बनताना आणि राष्ट्र उभारणीची आणखी एक संधी मिळवताना अभिमान वाटत आहे. ’पायाभूत सुविधा अर्थव्यवस्थेचे रोजगारनिर्मिती करून आणि इतर उद्योगक्षेत्रे, एमएसएमईज, एसएमईज अशा इतर उद्योगांना मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे या भव्य प्रकल्पात सहभागी करून मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत अशा अभियानांअंतर्गत त्यांच्याकडून आवश्यक सेवा घेऊन पुनरूज्जीवन करण्यासाठीचा उच्चबिंदू असेल, असे ते म्हणाले.

‘हे आतापर्यंत एल अँड टीच्या इतिहासातील सर्वात मोठे ईपीसी कंत्राट असून या भव्य आणि गुंतागुंतीचे पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही अत्याधुनिक बांधकाम पद्धती व विस्तृत डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहोत,’ असे संपूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर) एस. व्ही. देसाई म्हणाले.

असा आहे पहिलावहिला बुलेट ट्रेन प्रकल्प
– पहिल्याच प्रकल्पात मुंबई-अहमदाबाद हाय- स्पीड रेल्वे प्रकल्पाचा भाग असलेल्या २३७.१ कि.मी लांबीच्या एमएएचएसआर सी-४ पॅकेज बांधकामाचा समावेश आहे.

– महाराष्ट्रातील १५५.७६ कि.मी, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील ४.३ कि.मी आणि गुजरात राज्यातील ३४८. ०४ कि.मी, रेल्वे मार्गावरील १२ स्थानकांच्या बांधकामाचा समावेश आहे.

– पॅकेज सी-४ मध्ये ४६.६ टक्के एकूण लांबीचा समावेश असून ते सर्व पॅकेजेसमधील सर्वात लांब महाराष्ट्रातील झारोली गावापासून गुजरात सीमा ते वडोदरा स्थानकापर्यंत गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांमार्गे जाणार आहे.

– हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाय- स्पीड रेल्वे ताशी ३२० कि.मी च्या वेगाने संपूर्ण अंतर मर्यादित थांब्यासह अवघ्या २ तासांत तर सर्व थांब्यांसह केवळ तीन तासांत पूर्ण करेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here