नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं मोदी म्हणाले. फ्रान्समधील नाइस शहरात गुरुवारी चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका महिलेसह तीन जण ठार झाले. हल्लेखोरांनी चाकूने महिलेचा शिरच्छेद केला आणि इतर दोघांची निर्घृणपणे हत्या केली.

‘नाइसमध्ये चर्चच्या आत झालेल्या क्रूर हल्ल्यासह फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. पीडित व्यक्तींच्या कुटुंबीयांबद्दल आणि फ्रान्समधील नागरिकांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं.

काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या केल्यानंतर फ्रान्सने इस्लामिक कट्टरपंथीयांविरूद्ध फ्रान्सकडून कठोर कारवाई केली जात आहे. यामुळे मुस्लिम देशांमध्ये फ्रान्सविरोधात असंतोषाचं वातावरण आहे. अनेक मुस्लिम देशांकडून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ले होत आहेत. यावर फ्रान्सच्या अध्यक्षांना भारताने पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत आहे, असं मॅक्रोसवरील हल्ल्याचा निषेध करत परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

नाइसमधील चर्चच्या आत झालेला दहशतवादी हल्ला हा फ्रान्समधील गेल्या २ महिन्यांतील तिसरा हल्ला आहे. नॉट्रेड्रम चर्चमध्ये हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांच्या कारवाईने जखमी झाला आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २०१६ मध्ये बॅस्टिल डे परेड दरम्यान हल्लेखोराने गर्दीत ट्रक घुसवून अनेकांना चिरडलं होतं. आता हल्ला हा तिथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा झाला आहे.

हल्लेखोर पकडला गेला

चर्चमध्ये गुरुवारी झालेला हल्ल्यात एकट्याने केलेला केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे पोलीस इतरांचा शोध घेत नाहीत. हल्लेखोर जखमी झाल्यानंतरही वारंवार अल्लाहु अकबरचा नारा देत होता, असं नीसचे महापौर म्हणाले. दरम्यान, हल्ल्यातील मृतांना फ्रान्स संसदेत आदरांजली वाहण्यात आली. संसदेत काही वेळ मौन पाळून आदरांजली वाहिली गेली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here