पुणे: शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या खून प्रकरणात दलातील सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. प्रसिद्ध गुंड याच्या सांगण्यावरून हा खून केल्याचे तपासात समोर आले होते. ( Latest News Updates )

वाचा:

पुणे शहरातील बुधवार पेठेत दीपक मारटकर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. खून करण्यापूर्वी या आरोपींनी गुंड बापू नायर याची रुग्णालयात भेट घेतल्याचे समोर आले होते. सध्या नायर हा कारागृहात आहे. तो उपचारासाठी ससून मध्ये आला असता आरोपींनी त्याची भेट घेतल्याचे तपासात समोर आले. नायर याला ससूनमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आले होते. बंदोबस्त असतानाही आरोपी त्याला कसे भेटले, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात होती.

वाचा:

याकाळात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. त्याची दखल घेत या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. कामात कुचराई करत या कर्मचाऱ्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना निंलबित केले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा:

दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिवंगत विजय मारटकर यांचे पुत्र व युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here