नवी दिल्ली: येत्या २१-२२ नोव्हेंबरला होणाऱ्या जी -20 परिषदेची अध्यक्षता सौदी अरेबियाला मिळाली आहे. यानिमित्ताने मॉनिटरी अथॉरिटी ऑफ सौदी अरेबियाने २४ ऑक्टोबरला नवीन नोट जारी केली. पण या नोटांवर छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर हा स्वतंत्र प्रदेश दाखवला गेला आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना प्रश्न विचारला गेला. या प्रकरणी सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत आणि रियाधमधील भारतीय दुतावासाच्या माध्यमातून सौदी अरेबियाकडे गंभीर चिंता व्यक्त केली गेली आहे, असं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलंय.

भारताच्या सीमा अतिशय चुकीच्या पद्धतीने नोटेवर दाखवण्यात आल्या आहेत. तेही सौदीच्या कायदेशीर बँकेच्या नोटवर. यामुळे त्वरित सुधारणा करण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा सांगितलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान सौदी अरेबियाच्या या नोटमुळे चिंतेत आहे. कारण गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर हा प्रदेश पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आलेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here