या सामन्यापूर्वी केकेआरच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये केकेआरने सहा विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले होते. आजच्या १३व्या सामन्यात केकेआरला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे केकेआरचे १२ गुणच राहिले आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात चौथ्या स्थानावर पोहोचण्याचे स्वप्न त्यांचे भंगले आहे.
कसे होऊ शकते केकेआरचे आव्हान संपुष्टातकेकेआरने आतापर्यंत १३ सामन्यांत ६ विजय मिळवले असून ते १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आता एकच सामना त्यांचा बाकी आहे. हा सामना जर त्यांनी गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण दुसरीकडे केकेआरने आपला १४वा सामना जिंकला तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण आता अव्वल चार स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे या चारही संघांनी फक्त एक सामना जरी जिंकला तरी केकेआरला आयपीएलमधून बाहेर पडावे लागू शकते.
सध्याच्या घडीला मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचलेला आहे. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत. त्यामुळे एक सामना जिंकून ते बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतात. त्यामुळे प्ले-ऑफसाठी केकेआर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये कडवी झुंज होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. जर पंजाबच्या संघाला दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला तर केकेआर बाद फेरीत जाऊ शकते. पण पंजाबने एक सामना जरी जिंकला तरी रनरेटच्या जोरावर केकेआरपेक्षा पंजाबला बाद फेरीत जाण्याची जास्त संधी दिसत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Monitor Closely 1 mometasone inhaled and levofloxacin both increase Other see comment where to buy viagra at Dependence on intravenous inotropes for organ perfusion