वाचा:
विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते फटाका मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. करोनानंतर राज्यात सुरू होणार हे पहिले फटाका मार्केट ठरल्याचे सांगण्यात आले. नगरमध्ये होलसेल फटका विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. दिवाळीच्या आधीच शहराबाहेर हे विशेष मार्केट सुरू करण्यात येते. येथून परिसरातील भागातील किरकोळ विक्रेते फटाके घेऊन जातात. यावर्षी करोनामुळे त्याला परवानगी मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाने गेल्या महिन्यातच ऑनलाइन पद्धतीने परवाने देण्याची प्रक्रिया राबविली. त्यामुळे विक्रेत्यांनी तातडीने स्टॉल उभारले, मालही मागविण्यात आला. आजपासून विक्रीही सुरू करण्यात आली आहे.
वाचा:
यासंबंधी फटका दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले, ‘करोना व लॉकडऊन यामुळे सर्वत्र जे नैराश्याचे वातावरण झाले होते ते आता दिवाळी आल्याने बदलणार आहे. फटाका व्यापारी असोसिएशनला प्रशासनाने चांगले सहकार्य केले. त्यामुळे राज्यात सर्वप्रथम नगरच्या व्यापाऱ्यांना परवाना उपलब्ध करून दिल्याने लवकर स्टॉल सुरू करता आले.’
वाचा:
अर्थात यावर्षी स्टॉलची संख्या कमी झाली आहे. विविध कंपन्यांचे फटाके बाजारात आले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले आहेत. उत्पादनही कमी झालेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध कायम राहणार आहेत. रोखण्यासाठी सरकार आणि विविध संस्थांमर्फत केल्या जाणाऱ्या प्रचाराचाही परिणाम होऊन फटाक्यांच्या विक्रीत काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येते. आता करोनानंतर आलेल्या दिवाळीत काय चित्र राहते, हे लवकरच पहायला मिळणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times