अहमदनगर: एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले यांची काल, बुधवारी अचानक बदली करण्यात आली. एकाच महिन्यात ही बदली झाल्यानंतर त्याबाबत चर्चेला उधाण आले होते. त्यातच राठोड हे एका पोलीस कर्मचाऱ्याशी हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का? अशी विचारणा करीत आहे. त्यामुळे राठोड यांच्या बदलीमागे ही क्लिप असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, या क्लिप बाबतची खाते अंतर्गत चौकशी पूर्ण झाली असून त्याबाबतचा गोपनीय अहवाल नगरच्या पोलीस प्रशासनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाकडे गेल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

वाचा:

अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी एक महिन्यापूर्वीच नगर जिल्ह्यात अप्पर अधीक्षकपदाचा पदभार घेतला होता. त्यामुळे अचानक बदली कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आज सकाळी त्यांची व नेवासा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते हप्तेखोरी बाबत चर्चा करीत असून ही क्लिप जवळपास पाच मिनिटांची आहे. त्यामुळे आता या क्लिप मुळेच राठोड यांची बदली झाल्याच्या चर्चेला बळ मिळत असून या प्रकारानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

‘क्लिप’चा झाला उलटा प्रवास?

अप्पर पोलीस अधीक्षक राठोड व संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यातील संभाषणाची क्लिप सर्वात प्रथम पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गेली असल्याचे सूत्रांकडून समजले. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक यांनी संबंधित क्लिप बाबत चौकशी करण्याचे आदेश एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिले होते. मात्र संबंधित अधिकारी काही दिवस रजेवर होते. रजेवरून परत आल्यानंतर दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करून त्यांनी त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान दोनच दिवसापूर्वी नगरला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी भेट दिली होती. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ऑडिओ क्लिप संदर्भात ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here