म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः चार पाच महिन्यापूर्वी दहा ते वीस रूपये किलो असणारा कांदा गेल्या आठ ते दहा दिवसात शंभरीपार केल्याने सध्या त्याच्या दराचीच चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात तर सोने, चांदी, रोख रक्कम नव्हे तर चोरांनी थेट कांद्यावरच डल्ला मारला. मार्केट यार्डातील नऊ पोती कांदा चोरट्यांनी रात्री पळवला असून विशेष म्हणजे त्यांची चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

लॉकडाऊन काळात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. यामुळे घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जबरी चोऱ्याही वाढल्या आहेत. सोने, चांदी आणि रोख रक्कमेवर चोरटे डल्ला मारत आहेत. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका व्यापाऱ्याने चोरीची फिर्याद दिली. त्यामध्ये त्याच्या गोडावूनमधील कांदे चोरीला गेल्याचे ऐकताच पोलिसाने कपाळाला हात मारून घेतला.

गेऱ्या आठ दिवसापासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दहा रूपये किलो मिळणारा कांदा थेट शंभरीपार केल्याने सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी येत आहे. चोरांनी कांद्यावरच डल्ला मारत कांदा महाग झाल्याचा नवा पुरावा दिला. मार्केट यार्डातील एका गोडावूनमधून चोरट्यांनी नऊ पोती कांद्यासह पाच पोती बटाटा, एक पोती आलं आणि पाच पोती लसूण देखील पळवला आहे. विशेष म्हणजे ही सर्व चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

याबाबत प्रकाश उमराणी यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू वरक करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here