रायपूर: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका दिव्यांग मुलाचा फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सोशल मीडियावर शेअर करत संबंधित मुलाचे कौतुक केले होते. आता हा दिव्यांग मुलगा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

एका मैदानावर काही मुले खेळत आहेत. त्यांच्या सोबत एक दिव्यांग मुलगा देखील आहे. दिव्यांग मुलगा फलंदाजी करत आहे. दोन्ही पायाने चालता न येणाऱ्या या मुलाने शॉट मारला आणि गुढघ्यावर धावत दुसऱ्या विकेटपर्यंत पोहोचला. ISF अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला होता. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील दिव्यांग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मड्डारामसाठी शनिवारचा दिवस खास ठरला. कारण गॉड ऑफ क्रिकेट सचिनकडून त्याला एक भेट मिळाली.

वाचा-

नक्षलग्रस्त बस्तर येथे राहणाऱ्या मड्डाराम कवासी याला सचिनने क्रिकेट किट भेट दिली आणि खेळण्यासाठी प्रोत्साहन देखील दिले. १२ वर्षाचा मड्डाराम व्हिलचेअरवरून रायपूर येथे सामना पाहण्यासाठी आला होता. तेव्हा सचिनच्या मॅनेजरकडून त्याला सरप्राइझ गिफ्ट मिळाले. जेव्हा त्याला क्रिकेटचे किट भेटले तेव्हा मड्डारामला प्रचंड आनंद झाला.

सचिनकडून मिळालेली भेट त्याने स्वत: जवळ घेतली. ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वात खास क्षण आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूने मला भेट दिली. क्रिकेट हा माझा सर्वात जवळचा खेळ आहे. या भेटीमुळे मला क्रिकेट खेळण्यासाठी आणखी ताकद मिळाली. दिव्यांग असले तरी मी माझी स्वप्न पूर्ण करेन’, असे मड्डाराम याने सांगितले. तो गेल्या एका वर्षापासून क्रिकेट खेळत आहे.

मड्डारामला सचिनने एक पत्र देखील पाठवले आहे. त्यावर सचिनची स्वाक्षरी देखील आहे. तु ज्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद घेत आहेत ते पाहून छान वाटले. तुला आणि तुझ्या मित्रांना माझ्याकडून ही भेट. असेच खेळत रहा, असे सचिनने पत्रात म्हटले आहे.

सचिनने नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी मड्डारामचा व्हिडिओ शेअर केला होता. हा प्रेरणादायी व्हिडिओ असल्याचे सचिनने म्हटले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here