मुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित रिक्त जागांपैकी एका जागेवर शिवसेनेकडून अभिनेत्री यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींवरून माजी खासदार यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे शिवसेनेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतील,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष प्रत्येकी चार नावांची शिफारस करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी उर्मिला यांच्याशी संवाद साधल्याचं बोललं जातं.

वाचा:

या चर्चेचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा. आंदोलनं करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील,’ असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नीलेश राणे हे व ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर जोरदार प्रहार केला होता. तेव्हापासून नीलेश राणे अधिकच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेवर शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी नुकताच उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here