मुंबई: वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर गुरुवारी राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल यांची भेट घेणारे मनसे अध्यक्ष यांनी राज्यपालांनी दिलेला सल्ला अंमलात आणला आहे. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार, राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना फोन केल्याचं समोर आलं आहे.

खुद्द शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे. ‘राज ठाकरे यांचा फोन आला होता. राज्यपालांनी आपल्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे असं ते म्हणाले. त्यांच्याशी भेटण्याबाबत काहीही ठरलेलं नाही,’ असं पवारांनी म्हटल्याचं वृत्त ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

वाचा:

वाढीव वीज बिल व दूध दराच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांना दोन हजार बिल यायचं त्यांना १० हजार बिल आलं आहे. ज्यांना पाच हजार बिल यायचं त्यांना २५ हजार बिल आलं आहे. वीज कंपन्यांनी यावर तोडगा काढावा. राज्य सरकारनं त्यासाठी प्रयत्न करावा व राज्यपालांनी या संदर्भात सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी राज यांनी कोश्यारींकडे मांडली. तसं निवेदनही त्यांनी दिलं. त्यावर, ‘तुम्ही शरद पवारांशी बोला,’ असा सल्ला कोश्यारींनी राज यांना दिला होता. त्यानुसार, राज यांनी शरद पवारांना फोन केला.

वाचा:

दरम्यान, राज ठाकरे यांना राज्यपालांनी दिलेल्या सल्ल्यानंतर बरीच राजकीय टीकाटिप्पणी झाली होती. ‘शरद पवारच राज्य चालवतात. त्यामुळं राज्यपालांनी दिलेला सल्ला योग्यच आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर, उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात व वेळोवेळी सोनिया गांधी व शरद पवार यांचा सल्ला घेतात,’ असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here