वाचा:
पाथर्डी तालुक्यात बिबट्याने तीन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण असून नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच आमदार राजळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देत बिबट्याची बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे देखील उपस्थित होते. यावेळी राजळे यांनी बिबट्यामुळे पाथर्डी तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच त्याचा तातडीने बंद करण्याची मागणी केली.
वाचा:
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजळे म्हणाल्या, ‘गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बिबट्याने हल्ला करण्याचे प्रकार पाथर्डी तालुक्यात वाढले आहेत. सुरुवातीला कासार पिंपळगाव येथे एका मुलावर हल्ला झाला होता. परंतु तो सुदैवाने थोडक्यात बचावला. त्यानंतर मात्र मढी, केळवंडी , शिरापूर येथील घटनेत तीन चिमुरड्यांचा बळी गेला आहे. हा बिबट्या आता नरभक्षक झाला असून त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली आहे. त्यामुळे सरकारचे नियम व अटीचे पालन करत वनविभागाने त्याला जेरबंद करण्याची गरज आहे. कारण त्यामुळे आमच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सायंकाळी सहानंतर लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आता हात जोडून आमची विनंती आहे की, बिबट्याचा बंदोबस्त करा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times