वाचा:
अमेरिकेतील प्रत्यक्ष मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. फ्लोरिडा येथे एका सभेत बायडन भाषण करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र, बायडन यांनी भाषण थांबवले नाही. नेमका असाच प्रकार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साताऱ्यात घडला होता. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस आला. मात्र, पवारांनी भाषण सुरूच ठेवले. या सभेनं त्यानंतर निवडणुकीचा माहौलच बदलून टाकला. निकालानंतर नाट्यमय घडामोडी घडून राज्यात सत्तांतर झाले. तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज एक ट्वीट केलं आहे.
वाचा:
‘जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो, पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे,’ असं रोहित यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेप्रमाणेच बायडन यांच्या पावसाळी सभेची अमेरिकेत सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियात या सभेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. त्यामुळं रोहित पवारांचा अंदाज कितपत खरा ठरतो, हे लवकरच समजू शकणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times