अंकारा: तुर्कीमधील इजमिरमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. या भूकंपामुळे २० इमारती कोसळल्याची माहिती असून शेकडोजण इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हा आकडा वाढण्याची भीती आहे.

तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, या भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शह या भागातही इमारतींना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

वाचा:

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने सांगितले की, भूकंपाचे केंद्र ग्रीसमधील कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्व भागात १४ किमी दूर अंतरावर होते. जमिनीपासून कमी खोलवर भागात भूकंपाचे केंद्र असल्यामुळे तीव्र झटका लागला. यामुळेच अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी ट्विट करून भूकंप प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून नागरिकांना सर्व मदत केली जाणार असल्याची माहिती दिली.

वाचा:

वाचा:

सुनामीचा दावा?

सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडिओ शेअर केले आहेत. तुर्कीच्या पश्चिम शहरात भूकंपानंतर सुनामीची लाट आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओतील सत्यतेची पुष्टी अद्याप करण्यात आली नाही.

वाचा:

ग्रीसमध्ये ही गोंधळ

भूकंपाच्या धक्क्यानंतर सामोसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. काही घरांच्या आणि इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती उपमहापौरांनी दिली आहे. ग्रीस आणि तुर्की हे दोन्ही देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. खबरदारी म्हणून विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली.

याआधी १९९९ मध्ये तुर्कीच्या वायव्य भागात ७.४ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये १७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इस्तांबूलमधील एक हजार नागरिकांचा समावेश आहे. तर, २०११ मध्ये दक्षिणपूर्व भागात झालेल्या भूकंपामध्ये ६०० जणांचा मृत्यू झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here