पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. या नंतर मोदी यांनी केवडियाला पोहोचून अनेक योजनांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी भारताची समृद्ध पष्प परंपरांचे दर्शन घडवणारे, अनेक रोपांच्या लागवडीसह कल्याण आणि उत्तम आरोग्याच्या पारंपरिक पद्धतींवर केंद्रित आरोग्य वनाचे शुक्रवारी उद्घाटन केले. या वनात सुमारे पाच लाखांहून अधिक औषधी आहेत.
आरोग्य वनाच्या उद्घाटनाचा पाहा व्हिडिओ-
पंतप्रधान मोदींनी सेल्फी पॉइंटचे केले उद्घाटन
सुमारे १७ एकर जमिनीत पसरलेले आहे. या वनात विविध औषधी वनस्पतीव्यतिरिक्त अनेक आकर्षक फुलांची बहार असणार आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी संपूर्ण वनाची पाहणी केली. त्यांनी गोल्फ कार्टवर स्वार होत संपूर्ण आरोग्य वनाची सैर केली. या बरोबरच त्यांनी एका सेल्फी पॉइंटचे देखील उद्घाटन केले.
एकता मॉलसोबतच न्यूट्रिशन पार्कचेही लोकार्पण
आरोग्य वनाच्या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी यांनी एकता मॉलचे उद्घाटन देखील केले. या व्यतिरिक्त त्यांनी मुलांसाठी न्यूट्रिशन पार्कचे लोकार्पण केले.
क्लिक करा आणि वाचा-
केवडियामध्येच रात्री विश्राम
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री केवडियामध्येच विश्राम करणार आहेत. शनिवारी ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना ३१ ऑक्टोबरला त्यांच्या जयंती दिनी स्टॅच्यू ऑफ यूनिटी येते जाऊन श्रद्धांजली अर्पण करतील.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times