सर्दी – प्रदूषण हे मिश्रण धोकादायक आहे. त्यातच, फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांच्या अडचणींत आणखीनच वाढू शकते. कोविड १९ साठी उपचार सुरू असणाऱ्या आणि या आजारातून बरे झालेल्या रुग्णांवर याचा वाईट परिणाम दिसून येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
‘ फोडल्यानंतर छोटे छोटे कण हवेत मिसळले जातात, ज्याला आपण Aerosol म्हणतो, यामुळे कोविड विषाणू फैलावण्याचा धोका आणखीनच वाढतो. त्यामुळे दिवाळीत करोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे’ असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
वाचा : वाचा :
तसंच थंडीच्या दिवसांत प्रदूषणातही वाढ होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनही वाढलेलं दिसतं. दिवाळीत प्रदूषण वाढल्यानं दम्याच्या रुग्णांना तसंच कोविडच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास निर्माण होऊ शकतो, असंही त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, गुरुवारी देशभरात एकूण ४८ हजार ६४८ करोनाचे नवे रुग्ण आढळल्यानंतर देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ८० लाख ८८ हजार ८५१ वर पोहचली आहे. गुरुवारी २४ तासांत करोनाच्या ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत करोनामुळे प्राण गमावणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ०९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ५ लाख ९५ हजार ३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आत्तापर्यंत ७३ लाख ७३ हजार ३७५ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times