वाचा:
भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी सायंकाळी बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडत आहेत. सध्या खडसे आणि महाजन यांच्यातही शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी काल मुक्ताईनगरात गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना ‘पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच’, असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाच्या मागे कोण आहे ते येत्या कालखंडात दिसेलच. हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी लोकं येतील आणि जातील. पण दिवसेंदिवस पक्ष वाढतच चालला आहे. हे आपल्यालाही दिसत आहे. आज लोकसभा तसेच राज्यसभा मिळून ५०० पेक्षा अधिक खासदार भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतभर भाजपची घोडदौड वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणते? याला फार काही महत्त्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
वाचा:
शेती प्रश्नासाठी २ नोव्हेंबरला आंदोलन
कोअर कमिटीच्या बैठकीबाबत माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले की, सध्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जनसंपर्क अभियान तसेच आत्मनिर्भर भारत असा कार्यक्रम आलेला आहे. याबाबतीत चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत येत्या २ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात राज्य सरकारविरुद्ध जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. आज शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. शेतमालाच्या खरेदीबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. नोकरदार, विद्यार्थीवर्गाला अडचणी आहेत. या साऱ्या विषयांबाबत भाजपाकडून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times