तीव्र भूकंपाचा धक्का
यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल मोजण्यात आलीय. या भूकंपाचा परिणाम तुर्कस्तान, अथेन्स आणि ग्रीसवर दिसून आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून भूकंपाच्या स्थळी तत्काळ भूकंपग्रस्त मदत व बचाव पथक धाडण्यात आले. या भूकंपात तुर्कस्तानात आत्तापर्यंत सहा जणांनी आपला जीव गमावल्याचं समोर येतंय. परंतु, हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता जास्त आहे. इझमिरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० इमारती उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
वाचा :
ग्रीसलाही भूकंपाचा फटका
दुसरीकडे ग्रीसमध्ये कोसळलेल्या भिंतींच्या मलब्याखाली दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.ग्रीसच्या सामोस या बेटालाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ग्रीस सरकारनं सामोर बेटावर राहणाऱ्या जवळपास ४५ हजार नागरिकांना समुद्रतटापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
या भूकंपानंतर सोशल मीडियाद्वारे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यातील काही व्हिडिओत भूकंपानंतहर समुद्रकिनाऱ्यावरचं पाणीच गायब झालेलं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण होतं.
तर सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलेल्या काही व्हिडिओमध्ये तुर्कस्तानच्या पश्चिम भागातील शहरांत भूकंपानंतर त्सुनामीचा प्रभाव दिसल्याचा दावा केला जातोय. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं भूकंपानंतर समुद्राचं पाणी शहरात शिरल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय. परंतु, अद्याप या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.
‘फॉल्ट लाईन’वरचा देश
एक मोठी ‘फॉल्ट लाईन’ असलेल्या भूमीवर तुर्कस्तान हा देश वसला आहेत. त्यामुळे सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या देशांमध्ये तुर्कस्तानचा क्रमांक वरचा आहे. ऑगस्ट १९९९ मध्ये इस्तंबूलच्या दक्षिण-पूर्व भागातील इझमित शहरात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात १७ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०११ मध्ये वान या शहराला जाणवलेल्या तीव्र भूकंपात जवळपास ५०० जणांनी आपले प्राण गमावले होते.
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times