नवी दिल्ली: २०२० मधील प्ले ऑफसाठीची चुरस आणखी रंगतदार होत चालली आहे. आज शुक्रवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ७ विकेटनी पराभव केला आणि स्वत:च्या प्ले ऑफमधील आशा जिवंत ठेवल्या. या विजयासह ते गुणतक्त्यात ५व्या स्थानावर आले आहेत.

वाचा-

वाचा-

राजस्थानच्या आजच्या विजयाने पंजाब आणि त्यांचे गुण समान म्हणजे १४ गुण झाले. पण नेटरनरेटच्या जोरावर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल २०२० मध्ये साखळी फेरीतील ५० सामने झाल्यानंतर देखील अद्याप फक्त एकच संघ प्ले ऑफमध्ये गेला आहे. मुंबई इंडियन्स १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स १४ गुण आणि + ०.०४८ रनरेटसह दुसऱ्या तर दिल्ली कॅपिटल्स १४ गुण आणि +०.०३० रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

वाचा-

उद्या शनिवारी मुंबई इंडिन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे तर बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद अशी दुसरी लढत आहे. या दोन्ही सामन्यांच्या निकालावर प्ले ऑफमधील चुरस किती वाढले हे निश्चित होईल. जर मुंबईने विजय मिळवला तर दिल्लीला अखेरच्या लढतीत विजय मिळवावा लागले. दुसऱ्या लढतीत हैदराबादला बेंगळुरू विरुद्ध विजय मिळवणे बंधनकारक आहे. त्यांनी विजय मिळवला नाही तर स्पर्धे बाहेर होतील आणि बेंगळुरूचा पराभव झाला तर अखेरच्या लढतीत त्यांना देखील विजय मिळवणे आवश्यक ठरेल. त्या परिस्थितीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी नेट रनरेट हा घटक फार महत्त्वाचा ठरेल. दिल्ली आणि बेंगळुरूची अखरेची लढत एकमेकांविरुद्ध आहे. जर त्यांचा उद्याच्या सामन्यात पराभव झाला तर प्ले ऑफसाठीची शर्यत अधिक चुरशीची होईल.

वाचा-

वाचा-

सध्याच्या घडीला प्लेऑफच्या शर्यतीतून एकच संघ बाहेर पडला आहे तो म्हणजे तीन वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज होय. त्यांची अखेरची लढत पंजाबविरुद्ध आहे. आज पंजाबचा पराभव झाल्यामुळे चेन्नईविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचे आव्हान पंजाबपुढे असेल.

वाचा-

सनरायजर्स हैदराबादला उद्या बेंगळुरू विरुद्ध आणि त्यानंतर अखेरच्या लढतीत मुंबई विरुद्ध मोठा विजय मिळवावा लागणार आहे. तर कोलकाताची अखेरची लढत राजस्थानविरुद्ध असेल या लढतीत दोन्ही संघांना विजय हवा असेल. मुंबईने जरी प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी ते गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करतील. कारण प्ले ऑफमध्ये जो पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर जो संघ असतो त्याला एका विजयाने थेट फायनलचे तिकिट मिळते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here