मुंबई: राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित १२ मान्यवरांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील , आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी चार जणांना संधी मिळणार असून शिवसेनेच्या वतीने आश्चर्यकारकरित्या अभिनेत्री यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनी उर्मिला यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली आणि त्यानंतर उर्मिला यांनीही शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेने नेमकी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाला का पसंती दिली, यावरही तर्क लावले जाऊ लागले आहेत. (Why has picked For MLC seat )

वाचा:

उर्मिला मातोंडकर यांचा औपचारिक शिवसेना प्रवेश अजून बाकी आहे. ‘ब्रेक के बाद’ असेच त्यांच्या या राजकीय प्रवासाचे वर्णन करता येईल. उर्मिला यांनी राजकारणात पहिलं पाऊल ठेवण्यासाठी काँग्रेसला पसंती दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपचे गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे होते. या लढाईत उर्मिला यांचा पराभव झाला मात्र त्यांनी आपली छाप मात्र सोडली. पक्षातील अंतर्गत गटबाजीचा त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे त्या दुखावल्या गेल्या. आपलं गाऱ्हाणं त्यांनी गोपनीय पत्राच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे मांडले. मात्र नंतर हे पत्र माध्यमांत लीक झाले आणि वादळ उठले. मला निवडणुकीत मदत न करणाऱ्या काही नेत्यांनाच पक्षात बढती देऊन सन्मानित करण्यात आले आहे, अशी त्यांची सल होती. त्यातून मग त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षाला सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर केवळ अॅक्ट्रेस, अॅक्टिव्हिस्ट, पॉलिटिशियन, आपली मुंबईची मुलगी अशी ओळख त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवर ठेवली. पक्षीय राजकारणापासून त्या दूर राहिल्या. असे असतानाच आता राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उर्मिला यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे.

वाचा:

खरंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उर्मिला यांना विधान परिषद सदस्यत्वासाठी विचारणा केली होती मात्र त्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. हे कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केला. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तुम्ही शिवसेनेच्या वतीने परिषदेवर जावे, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केली आणि त्याला उर्मिला यांनी होकारही दिला, असे सांगण्यात आले. यावर आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसचीही कोणतीच हरकत नाही. आता शिवसेनेने हा निर्णय अचानक का घेतला, हा कळीचा प्रश्न असून त्याला तशीच पार्श्वभूमीही आहे.

वाचा:

काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला राजकीय वर्तुळात फारशा चर्चेत नव्हत्या. मात्र, अभिनेत्री विरुद्ध शिवसेना संघर्ष भडकला आणि त्यातूनच उर्मिला प्रकाशझोतात आल्या. बॉलीवूड व ड्रग्ज कनेक्शनचे गंभीर आरोप करत कंगनाने महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही तिने केला. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना उर्मिला यांनी सडेतोड शब्दांत कंगनाला फटकारले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सावधपणे यावर व्यक्त होत असताना उर्मिला यांनी कंगनाची चांगलीच खरडपट्टी काढली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्यापेक्षा तू तुझ्या राज्याकडे आधी लक्ष दे. ड्रग्जची किड जी देशभरात पसरली आहे त्याचे मूळ तुझ्या हिमाचल प्रदेशातच आहे. हिमाचलच ड्रग्जचे उगमस्थान आहे. त्यामुळे तुला उपदेशवगैरे द्यायचे असतील तर त्याची सुरुवात तुझ्या राज्यापासून कर, असा पलटवार उर्मिला यांनी केला होता. त्यानंतर बिथरलेल्या कंगनाने ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ अशी संभावना करत उर्मिला यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यावरून तीव्र पडसाद उमटले. सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी व अनेक मान्यवरांनी कंगना राणावतला फैलावर घेतले. हे सर्व घडत असताना उर्मिला यांनी कमालीचा संयम दाखवला. माझ्या पाठिशी उभे राहणाऱ्या सच्चा भारतीयांची मी ऋणी आहे. हा फेक आयटी ट्रोल्सवरील विजय आहे, अशा भावना उर्मिला यांनी व्यक्त केल्या होत्या. उर्मिला यांचा हाच संयमी आणि महाराष्ट्रप्रेमी बाणा शिवसेनेला भावला आहे. उर्मिला यांच्यात राजकीय प्रगल्भता दिसते. सामाजिक प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे नमूद करत शिवसेना नेते उर्मिला यांना दाद देत आहेत. दुसरीकडे उत्तम वक्तृत्व कौशल्य, मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषांवरील प्रभुत्व ही बाबही सेनेच्या पसंतीचे कारण ठरली आहे. जी माहिती मिळत आहे त्यानुसार उर्मिला यांना शिवसेना प्रवक्त्यांच्या यादीतही स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळणार आहे. याआधी अशाच प्रकारे प्रियांका चतुर्वेदी यांचाही शिवसेना प्रवेश अनेकांना धक्का देणारा ठरला होता. आता उर्मिला यांना संधी देऊन शिवसेनेने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत व राजकीयदृष्ट्या हा ‘परफेक्ट’ निर्णय आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here