एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे जवान सहभागी झाले होते. चार वरिष्ठ अधिकारी, दोन कनिष्ठ अधिकारी आणि १० जवान अशा १६ जणांच्या चमूने सहभाग घेतला होता. यातील काही जवानांच्या पायांना गंभीर जखमाही झाल्या होत्या. युद्धभूमीवरील जखमांना विसरून जवान मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी या मॅरेथॉनमध्ये दिला.
यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व दिसले. इथिओपिआचा डेरारा हरीसाने विजेतेपद पटकावले. महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटीलने दुसरा आणि नाशिकच्या मोनिका अथरेने तिसरा क्रमांक पटकावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times