वाचा-
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने मनदीप सिंगला शून्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने कर्णधार केएल राहुल सोबत शतकी भागीदारी केली. या दोघांनी वेगाने धावा केल्या. गेलने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. ही जोडी मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना. राहुल ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरनने १० चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला. त्याने ६३ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकार मारले. त्याचे शतक अवघ्या एका धावाने हुकले.
वाचा-
वाचा-
विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्सने धमाकेदार सुरूवात करून दिली. स्टोक्सने २६ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ५० धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा राजस्थानने ५.३ षटकात ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसगने रनरेट कमी होऊ दिला नाही. त्याने उथप्पासह धावांची गती गरजेपेक्षा अधिक ठेवली. संघाने शतकी टप्पा ओलांडल्यानंतर उथप्पा ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात संजू ४८ धावांवर धावबाद झाला.
वाचा-
संजू सॅमसग बाद झाला तोपर्यंत सामना राजस्थानच्या हातात आला होता. अखेर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी विजयाची औपचारीकता १५ चेंडू राखून पार केली.
वाचा-
या विजयामुळे राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times