वाचा:
राज्यात आज ६ हजार १९० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्याचवेळी ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ३ हजार ५० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () आता ८९.८५ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत ८९ लाख ६ हजार ८२६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १६ लाख ७२ हजार ८५८ (१८.७८ टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २९ हजार ४६२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सवालाखापर्यंत खाली आला आहे. राज्यात सध्या १ लाख २५ हजार ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २४ हजार ५७३ रुग्ण जिल्ह्यात आहे तर पालिका हद्दीत हा आकडा १९ हजार २७ तर जिल्ह्यात १८ हजार ५७८ इतका आहे. ठाणे व पुणे जिल्ह्यातील आलेख वेगाने खाली येताना दिसत आहे.
वाचा:
राज्यात आतापर्यंत ४३ हजार ८३७ करोनामृत्यू
राज्यात आज आणखी १२७ करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता ४३ हजार ८३७ इतका झाला आहे. आज सर्वाधिक ३२ मृत्यूंची नोंद मुंबईत झाली. त्यानंतर पुणे पालिका हद्दीत सहा तर पुणे जिल्ह्यात ७ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील सध्या २.६२ टक्के इतका आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times