राज्यातील भाजपच्या प्रस्थापित नेत्यांचे महत्त्व कमी करून त्यांच्याविरोधात ताब्यात राहतील अशा पर्यायी नेत्यांना पुढे आणण्याची रणनीती भाजपच्या नेतृत्वाची असल्यामुळे भाजपसाठी गेली अनेक वर्षे कष्ट उपसलेल्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांचे जिल्ह्याजिल्ह्यांतील महत्त्व कमी करण्यासाठी पर्यायी नेत्यांना प्रदेश भाजपच्या नव्या नेतृत्वाकडून बळ दिले जात असल्याचा सूर पक्षात उमटत आहे.
सन २०१४पर्यंत प्रदेश नेत्यांच्या कोअर कमिटीमार्फत चालवला जात होता. प्रादेशिक विभागवार नेत्यांना कोअर कमिटीत स्थान होते. उत्तर महाराष्ट्रातून , मराठवाड्यातून , कोकणातून , विदर्भातून नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांची कोअर कमिटी असायची. स्थानिय स्वराज्य संस्थांची निवडणूक असो वा विधान परिषदेचे उमेदवार ठरवायचे असो, या कोअर कमिटीत बहुमताने निर्णय होत. पण, २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही रचनाच बदलली. उलट कोअर कमिटीतील नेत्यांचे महत्त्व कमी केले गेले. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांच्या जागी पर्यायी नेतृत्व उभे करण्याची रणनिती आखली गेली. यात खडसे यांच्याविरोधात २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून गिरीष महाजन यांचे नेतृत्व उभे करण्यात आले. यात महाजन यांना ताकद देण्यात आली. अखेर वैतागून खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
पंकजा मुंडे यांचे राज्यातील महत्त्व कमी करण्यासाठी त्यांची राष्ट्रीय सचिवपदावर नियुक्ती केली आहे. तसेच एकीकडे राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनाही पडद्याआडून मदत केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर आता ऊसतोड कामगारांच्या प्रश्नात सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांच्यासमोर उभे करण्यात आले. यांच्यातल्या वादातही धस यांना बळ मिळत आहे.
नागपूरसह विदर्भात तेली समाजाचे प्राबल्य असलेले अनेक मतदारसंघ आहेत. परंतु असे असताना एका उद्योगपतीच्या तक्रारीवरून बावनकुळेंचे विधानसभेचे तिकीट कापले गेले होते.
मुंबईसह कोकणात विनोद तावडे यांचे नेतृत्व होते. परंतु, त्यांचीही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना राष्ट्रीय राजकारणात पाठवले गेले आहे. तर कोकणाचे नेतृत्व शिवसेना आणि मनसे असा राजकीय प्रवास करून आलेल्या प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आले आहे. राज्यातील विविध भागांत उभ्या केलेल्या या पर्यायी नेतृत्वाला भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी अजून स्वीकारलेले नाही. किंबहुना त्यामुळे अस्वस्थतेत वाढ होत आहे, असा भाजपमध्ये सूर आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times