औरंगाबादः राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यातच काँग्रेस नेते यांनी भर कार्यक्रमात केलेल्या तक्रारीमुळं काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे.

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं होतं. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेसमधील खदखद समोर आल्याचं म्हटलं जातं आहे. ‘काँग्रेसच्या पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडला मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं चव्हाणांच्या या विधानामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधीही महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले होते. तेव्हा पक्षातील जेष्ठ नेत्यांनी यावर पडदा टाकताना महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असल्याचं म्हटलं होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच वारंवार बैठका होत असताना काँग्रेसला मात्र, सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्यानं काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखद आहे. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी थेट पत्रकारांकडे आपली नाराजी व्यक्त केल्यानं आघाडीत बराच अंतर्गंत तणाव असल्याचं उघड झालं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here