मुंबई : ‘करोना संकटात पोलिसांचे काम अत्यंत खडतर आहे. अनेक आव्हाने आणि प्रचंड ताण असूनही त्याला तोंड देत पोलिसांचे काम सुरू आहे. जीवाचा धोका पत्करून १२-१२ तास ते काम करत आहेत’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची प्रशंसा केली आहे.मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह ट्विट्स करून समुदायांत तेढ आणि सामाजिक अशांततेचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील सुनयना होळे यांच्याविरोधात तीन एफआयआर दाखल झाले. अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी होळे यांनी याचिका केली आहे. यावेळी ‘बीकेसी सायबर पोलिसांनी चौकशीसाठी वारंवार बोलावूनही त्या हजर झाल्या नाहीत’, असे सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. त्यावर होळे २ नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर हजर राहतील, अशी ग्वाही त्यांच्या वतीने अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबरला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here