सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेमध्ये चर्चासत्रांना जोर आला आहे. राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने दिलेल्या या प्रस्तावामुळं सोशल डिस्टनसिंग पाळता येणं शक्य असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सध्या रेल्वेकडून ३१४१ लोकल सुरू करण्याची तयारी आहे, मात्र, यातून २४ लाखांहून अधिक प्रवाशांना प्रवास करण्यास अडचणी येणार असल्याची शक्यता आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यांसा बसमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या मात्र, पीक अवर्समध्ये लोकांची वाढती गर्दी आणि लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हीच स्थिती लोकलमध्येही निर्माण होता कामा नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्यासाठी सामान्य मुंबईकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची विभागणी करण्याबाबत आवश्यक उपाययोजना झालल्या नाहीत. गर्दी विभाजनासाठी राज्य सरकार अॅप अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय करत नाही, तोपर्यंत सामान्य मुंबईकरांचा लोकलप्रवास प्रत्यक्षात येणार नाही.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार?; हे असणार सर्वात मोठे आव्हान

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेमध्ये चर्चासत्रांना जोर आला आहे. राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने दिलेल्या या प्रस्तावामुळं सोशल डिस्टनसिंग पाळता येणं शक्य असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सध्या रेल्वेकडून ३१४१ लोकल सुरू करण्याची तयारी आहे, मात्र, यातून २४ लाखांहून अधिक प्रवाशांना प्रवास करण्यास अडचणी येणार असल्याची शक्यता आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यांसा बसमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या मात्र, पीक अवर्समध्ये लोकांची वाढती गर्दी आणि लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हीच स्थिती लोकलमध्येही निर्माण होता कामा नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

बैठकीत तोडगा काढणार?
बैठकीत तोडगा काढणार?

राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर रेल्वेनं उत्तर दिलं आहे. त्यानंतर, राज्य सरकारनंही यावर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलली आहेत. लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली व्हावी म्हणून आम्ही प्राधान्याने योजना तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यानं अतिरिक्त सुरक्षा द्यायला हवी. तसंच, आधी गर्दी नियंत्रणासाठी उपाय, मग प्रवासाची मुभा’, असा सावध पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यामुळं पुढील आठवड्यात एक उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे. यात राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या बैठकीत ५६ लाख प्रवाशांचा मुद्दा मुख्य असणार आहे. यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे.

५६ लाख प्रवाशांवर संकट
५६ लाख प्रवाशांवर संकट

मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी रोज ३१४१ लोकल धावत होत्या. यात जवळपास ८० लाख मुंबईकर रोज प्रवास करत होते. प्रत्येत लोकलमध्ये जवळपास २५४६ प्रवासी प्रवास करतात. पीक अवर्समध्ये जवळपास ४५०० प्रवासी एका लोकलमध्ये प्रवास करतात. पण, १२ डब्ब्यांच्या लोकलची क्षमता १२०० प्रवासी इतकी आहे. करोनाच्या काळात सोशल डिस्टनसिंगचा पालन करून एका लोकलमध्ये ७०० प्रवासी प्रवास करु शकतात. या अटी शर्तींसह प्रवास करायचा असल्यास ५६ लाख प्रवाशांसाठी प्रवासाचे संकट निर्माण होईल.

लॉकडाऊनआधीची आकडेवारी
लॉकडाऊनआधीची आकडेवारी

लॉकडाऊनच्या आधी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर ३१४१ लोकलमध्ये जवळपास ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. यात पहिली ट्रेन ते सकाळी ८ पर्यंतच्या लोकलमध्ये जवळपास ४८५ लोकल सेवा चालवल्या जात होत्या यात जवळपास ७. ५ लाख लोक प्रवास करत होते. ८ नंतर पीक अवर्स सुरू होतो. ज्यात सकाळी ८ ते ११ पर्यंत एकूण ६०३ लोकलमध्ये जवळपास २२ लाख लोक प्रवास करत होते. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत एकूण ७५१ लोकलमध्ये १९ लाख प्रवासींची संख्या होती. त्यानंतर, संध्याकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत एकूण ७४३ लोकल चालवल्या जात होत्या यात २५ लाख लोक प्रवास करत होते. तर, रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत एकूण ६९९ लोकलमध्ये ७ लाख लोक प्रवास करत होते.

सध्याची परिस्थीती
सध्याची परिस्थीती

लॉकडाऊननंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एकूण १४१० लोकल चालवल्या जातात त्यात जवळपास ९ लाख प्रवासी प्रवास करतात. यात पहिली ट्रेन सकाळी ८ पर्यंत २०० लोकलमध्ये जवळपास १ लाख लोक प्रवास करतात. ८ ते सकाळी ११ पर्यंत एकूण २९९ लोकलमध्ये जवळपास २ लाख ४१ हजार लाख लोक प्रवास करतात. सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत एकूण ३२१ लोकल चालवल्या जातात त्यात २ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात. तसंच, संध्याकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत एकूण ३४२ लोकलमध्ये २ लाख ३१ हजार प्रवासी प्रवास करतात. रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत २४८ लोकल चालवल्या जातात त्यात जवळपास ६० हजार प्रवासी असतात.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here