मुंबई : आर्थिक अनिश्चितता आणि करोनाची दुसरी लाट गुंतवणूकदारांसाठी धोक्याची सूचना घेऊन आली आहे. सहा महिन्यांनंतर सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा करोनाच्या प्रकोपाने धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील पैसे काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या सत्रात झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ४१८ रुपयांनी महागले. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०२८२ रुपयावर बंद झाला. तत्पूर्वी सोने ५०८७० रुपयांपर्यंत वाढले होते. चांदीमध्ये देखील ७४८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो ६०१७२ रुपयांवर बंद झाला. मोतीलाल ओसवालचे कमॉडिटी तज्ज्ञ नवनीत दमानी यांच्या मते जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस १८६० ते १८९० डॉलर राहील. भारतीय बाजारपेठेत सोने प्रती १० ग्रॅमसाठी ५०२५० रुपये ते ५०६५० रुपयांच्या दरम्यान राहील.

goodreturns.in या वेबसाईटनुसार शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९०१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२४६० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४८९१० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२५२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७६०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१९०० रुपये आहे.

डॉलरच्या मूल्यात सुधारणा व जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ते म्हणाले की सोने ०.५३ टक्क्यांनी घसरून १८६७.१ डॉलर प्रती औंसवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याकडे इतर चलन धारकांनी काहीसे दुर्लक्ष केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले की, कोरोना विषाणू मदत निधीबाबतचा करार नोव्हेंबर २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच होईल.

अमेरिकेतील कामगार बाजारात मंदी असूनही अर्थव्यवस्था २०२० च्या तिस-या तिमाहीत चांगल्या गतीने सुधारत आहे. यावरून सरकराने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर मदत केल्याचे दिसून येते. त्यामुळेही पिवळ्या धातूच्या मागणीवर काहीसा नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका, युरोप आणि जगातील अन्य महत्त्वाच्या भागात नव्याने कोरोनाची लाट आल्याने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान अनिश्चिततेचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याचे आकर्षण वाढून नुकसान काही प्रमाणात कमी झाले. अमेरिकेच्या अतिरिक्त मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे डॉलरला काहीसा आधार मिळाला. त्यामुळेही सोन्याचे दर आणखी कमी झाले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घटण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here