अहमदनगर: रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत (वय – ६०) यांचा मृत्यू झाला आहे. अरूण सावंत यांच्यासह एकूण ३० जण हरिश्चंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे काल, शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.
गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे यांचा काल, हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत अपघाती मृत्यू झाला. या मोहिमेत ३० जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times