मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कंगना राणावत प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. कंगना राणावतवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तिला समन्सही बजावले होते. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली आहे. कंगना ही या प्रकरणातील संशयीत आरोपी आहे. ती मला शूर मुलगी आहे, असं वाटत होते. तिला पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तिन पोलिसांवर हजर राहावं, असं राऊतांनी म्हटलं आहे.
सरकार पाच वर्ष टिकेल
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होणारच होते. हे सरकार असेच होईल हे मला निवडणूकीच्या आधीपासूनच वाटत होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याशिवाय, ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण सरकार पाच वर्ष टिकेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times