राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यावर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही पलटवार केला आहे. ‘आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून बाहेर येण्याची गरज आहे’, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडे मिळत नाही. म्हणून सगळे राज्यपालांना भेटत आहे. राज ठाकरे हेसुद्धा याच भावनेतून राज्यपालांना भेटले. याआधीही महाराष्ट्रातील नेते राज्यपालांना भेटले आहेत. नेते राज्यपालांकडे का जातात याचं आत्मपरिक्षण करावं,’ अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
आघाडी सरकारमध्ये कुरबरी
‘काँग्रेस नेते यांच्या विधानावरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे हे दिसतंय. सगळ्या प्रश्नांचं अपयश झाकण्यासाठी हे असे वक्तव्य ठरवून करत आहेत, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विकास कामांच्या निधीवरून यांच्यात मतभेद होतात. आपल्याच पक्षाचा फायदा व्हावा अशी पक्षीय चढाओढ असताना महाराष्ट्राची जनता आणि विकासाकडे दुर्लक्ष होत आहे,’ अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times