सांगली: इस्लामपूरजवळ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या निर्घृण खुनाचा पोलिसांनी २४ तासात उलगडा केला. कोळंबी उधार न दिल्याने आणि मागील उधारी मागितल्याचा रागातून चौघांनी (वय २६, रा. तुजारपूर, ता. वाळवा) याचा खून केल्याचे समोर आले होते. मात्र, उधारीवर खरेदीचे कारण पुढे करून हल्लेखोरांनी सहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला अक्षयच्या खुनातून घेतल्याचे तपासात उघडकीस आला आहे. ( Latest News Updates )

वाचा:

खून प्रकरणी पोलिसांनी मदन संभाजी कदम (३५, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), अर्जुन उर्फ हणमंत उर्फ नाना प्रल्हाद बाबर (४५, रा. तुजारपूर) आणि संपत गायकवाड (रा. करंजवडे, ता. वाळवा) या तिघांना अटक केली असून, एक संशयित अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस उपअधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुजारपूर येथील अक्षय भोसले हा सात वर्षांपासून ठाण्यात राहत होता. आर्थिक वादातून २०१५ मध्ये (रा. तुजारपूर) याचा ठाण्यात खून झाला होता. या खून प्रकरणी अक्षय भोसले प्रमुख संशयित आरोपी होता. मात्र पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली. लॉकडाऊन सुरू होताच तो गावाकडे आला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याने इस्लामपूरमध्ये ए-वन फिश सेंटर सुरू केले होते.

वाचा:

मदन कदम याने अक्षयकडे उधार कोळंबी मागितली. मात्र, आधीच्या उधारीचे पैसे मागत त्याने उधार कोळंबी देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून मदन कदम याने तुजारपूरमधील अर्जुन बाबर आणि त्याचा भाचा संपत गायकवाड यांना सोबत घेऊन अक्षयच्या खुनाचा कट रचला. सहा वर्षांपूर्वी झालेल्या शिवाजी बाबर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अर्जुन बाबरला संधी चालून आली होती. या तिघांनी आणखी एका साथीदारासह गुरुवारी अक्षयवर पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला. रात्री नऊच्या सुमारास इस्लामपूर-सांगली रोडवरून तुजारपूरकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर त्याला गाठले. कोयता आणि चाकूचे २९ वार करून त्याचा निर्घृण खून केला. मयत अक्षय आणि हल्लेखोर मदन यांच्यात मोबाइलवर झालेल्या संभाषणातून पोलिसांनी खुनाचा उलगडा केला. खुनानंतर पसार असलेल्या चौथ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख करीत आहेत.

वाचा:

सहा वर्षे मनात राग

सहा वर्षांपूर्वी ठाण्यात शिवाजी बाबरचा खून झाला होता. या खुनातून अक्षय भोसले निर्दोष सुटल्याने तुजारपूरमधील अर्जुन बाबर आणि त्याच्या नातेवाईकांच्या मनात अक्षयबद्दल प्रचंड राग होता. सहा महिन्यांपूर्वीच अक्षय गावाकडे परतल्याने हा राग वाढला. यातूनच त्याचा काटा काढल्याची कबुली हल्लेखोरांनी पोलिसांकडे दिली. सात महिन्यांपूर्वीच अक्षयने मामाच्या मुलीसोबत लग्न केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here