येरेवान: अजरबैझानने नागोर्नो-काराबाख भूभाग ताब्यात घेण्यासाठी तुर्कीसोबत एक मोठी रणनीती तयार केली होती. तुर्की आणि इस्रायलने दिलेल्या शस्त्रांच्या मदतीने अचानकपणे हल्ला करत अवघ्या पाच दिवसांत विजय मिळवू असा विश्वास अजरबैझानला होता. मात्र, आर्मेनियाने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे अजरबैझान बॅकफूटवर गेला आहे. आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यात मागील महिनाभरापासून युद्ध सुरू आहे.

या युद्धात आर्मेनियाच्या तुलनेत अजरबैझानला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. आर्मेनियापेक्षा अजरबैझानची जीवितहानी आणि आर्थिक नुकसान अधिक झाले आहेत. काकेकश भागात तैनात असलेल्या एका सैन्य अधिकाऱ्याने एशिया टाइम्सला सांगितले की, अजरबैझानने नागोर्नो-कारबाख ताब्यात घेण्यासाठी नियोजन केले. अचानकपणे हल्ला करून तीन ते पाच दिवसांत युद्ध संपवून आर्मेनियाच्या सैन्याला मागे ढकलता येईल असा त्यांचा कयास होता. मात्र, तो पूर्ण झाला नाही. ही सैनिकी कारवाई २७ सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. आता महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. या लढाईत आतापर्यंत पाच हजारजणांचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे.

वाचा:

एक हजार दहशतवाद्यांची भरती

तुर्कीने आर्मेनियाविरोधात लढण्यासाठी सीरियातून एक हजार दहशतवाद्यांनी भरती केली असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दहशतवाद्यांनी कारबाखमध्ये कमी सैन्य असलेल्या ठिकाणी अचानकपणे हल्ला करून तो भाग ताब्यात घ्यायचा होता. मात्र, अजरबैझानने आर्मेनियाच्या सैनिकांना कमी लेखत चूक केली. आर्मेनियाच्या सैनिकांना डोंगराळ भागात लढाई करण्याचा अधिक अनुभव असल्याचा एका युरोपीयन सैन्य अधिकाऱ्याने म्हटले.

वाचा:

वाचा:

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अजरबैझानने ही आक्रमक लष्करी कारवाई केली. आर्मेनियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडून मदत मिळेपर्यंत आपला डाव यशस्वी होईल असा अजरबैझानला विश्वास होता. नागोर्नो-काराबाखच्या क्षेत्रावर ताबा घेतल्यानंतर शस्त्रसंधी लागू करून भूभागावर ताबा ठेवता आला असता. मात्र, आर्मेनियाच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत अजरबैझानचा डाव उधळून लावला.

हे युद्ध थांबावे यासाठी रशिया आणि अमेरिकेने प्रयत्न केले होते. मात्र, अजरबैझान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप करत युद्धाला सुरू केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here