मिनिऑपॉलिस येथील ९३ वर्षांच्या महिलेच्या निधनानंतर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीमध्ये ‘ यांना मत देऊ नका,’ असे आवाहन केले आहे. या जाहिरातीची अमेरिकेत चर्चा सुरू आहे. जॉर्जिया मे अॅडकिन्स असे या महिलेचे नाव असून, २८ सप्टेंबर रोजी त्यांचा पक्षाघाने मृत्यू झाला. त्यानंतर मृत महिलेच्या इच्छेनुसार श्रद्धांजली जाहिरातीमध्ये ट्रम्प यांना मत देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. जॉर्जिया यांच्या मृत्युपत्रामध्ये ही इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार जॉर्जिया यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या श्रद्धांजलीमध्ये हे आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वाचा: वाचा:
आपल्या निधनानंतर श्रद्धांजलीसाठी फुलांवर खर्च न करता त्याऐवजी ट्रम्प यांना मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले. आजींची ही शेवटची इच्छा असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले.
वाचा:
दरम्यान, अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी प्रचारासाठी जोर लावला असून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तर,हिंदू मतदारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्याकडून हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना करण्यात येत आहेत. या निवडणुकीत हिंदू आणि भारतीय वंशाच्या मतदाराची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये हिंदू धर्म चौथ्या क्रमांकाचा मोठा धर्म असून, २०१६च्या आकडेवारीनुसार लोकसंख्येमध्ये हिंदूंचे प्रमाण एक टक्क्यांपर्यंत आहे. बायडन यांनी सप्टेंबरमध्ये ‘हिंदू अमेरिकन फॉर बायडन’ ही मोहीम सुरू केली, तर ट्रम्प यांनी त्या आधीच ऑगस्टमध्ये ‘हिंदू व्हॉइसेस फॉर ट्रम्प’ची घोषणा केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times