जौनपूर: उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या () वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यंत्री (Yogi Adityanath) यांनी जौनपूरमध्ये या गुन्ह्यात सहभागी होणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. अशा लोकांनी ‘रामनाम सत्य है’च्या यात्रेसाठी तयार राहावे. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी ताकीद दिली आहे. (up cm warns)

लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याची परवानगी दिली जाता कामा नये, असे काल शुक्रवारी अलाहाबाद हायकोर्टाने आदेश दिले आहेत. यामुळे आम्ही हा प्रकार सक्तीने रोखण्याचे काम करू असा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आम्ही एक कडक कायदा तयार करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

‘राम नाम सत्य हैंची यात्रा निघणार आहे’
छद्म वेशात नाव लपवून जे लोक मुलींच्या जीवनाशी खेळतात, अशांची ”ची यात्रा निघणार आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. आम्ही मिशन शक्ती हा कार्यक्रम याचसाठी चालवत आहोत. प्रत्येक आई-बहिणीच्या सुरक्षेची हमी देणे हाच मिशन शक्ती या कार्यक्रमाचा उद्देश आहे. काहीही झाले तरी त्यांची सुरक्षा करणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आम्ही त्यांच्या सन्मानाची सुरक्षा करू. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल आणि बहिणी-मुलींचा सन्मान होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

काय म्हटले हायकोर्टाने?

फक्त लग्नासाठी धर्म परिवर्तन करणे वैध नाही, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे. वेगवेगळ्या जोड्यांनी दाखल केलेली याचिका खारिज करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना संबंधित मॅजिस्ट्रेटसमोर हजर होऊन आपले म्हणणे मांडण्याची सूट दिली आहे. आमच्या शांततापूर्ण आयुष्यात कुटुंबीयांनी हस्तक्षेप करण्यापासून कुटुंबीयांना रोखण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेच म्हटले होते. कोर्टाने या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा आदेश न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी यांनी प्रियांशी उर्फ समरीन आणि इतरांच्या याचिकेवर दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here