नवनीत सक्सेना हे नौचंदी ठाणे क्षेत्रात येणाऱ्या सम्राट पॅलेस येथे राहतात. ते नोएडातील एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. त्यांची पत्नी प्रियंका आणि ३ वर्षांचा मुलगा विराज असे त्यांचे कुटुंब आहे. विराज शास्त्रीनगरात असलेल्या अमेरिकन किड्स स्कूलच्या नर्सरीचा विद्यार्थी आहे. करोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. यामुळे विराजने हातात पेंटिंगचा ब्रश आणि ड्रॉइंग पेपर घेतला. त्यानंतर आत लपलेली त्याची प्रतिभा विकसित झाली.
जुलै महिन्यात मिळाले पहिला पुरस्कार
विराजने आपले पहिले पेंटिग तो २ वर्षे ७ महिन्यांचा असताना तयार केली, अशी माहिती त्याच्या आईने दिली. त्यानंतर तो हातात ब्रश घेऊन कॅनव्हॉसवर काही ना काही साकारतच राहिला. त्यानंतर विराजने एक अतिशय उत्तम पेंटिंग तयार केली. या पेंटिंगला विश्वकर्मा आर्ट इंटरनॅशनल, दिल्लीने पुरस्कार दिला. हा विराजला मिळालेला पहिला पुरस्कार होता. त्यावेळी विराजचे वय २ वर्षे १० महिने इतके होते, अशी माहिती त्याची आई प्रियंका यांनी दिली.
राज्यपाल आनंदीबेन यांनीही केला सन्मान
यानंतर विराजच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. तेथे त्याला ‘व्हर्सटाइल पेंटर’चा किताब मिळाला. त्यानंतर त्याचे नाव इंडनय बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये पोहोचले. तेथे त्याला यंगेस्ट ‘व्हर्सटाइल आर्टिस्ट’ आणि ‘ग्रँड मास्टर’ या उपाधी मिळाल्या. विराजची कलाम वर्ल्ड रेकॉर्डसाठीही निवड झाली. यासाठी २७ ऑक्टोबर या दिवशी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विराजचा विशेष सन्मान केला.
क्लिक करा आणि वाचा-
विराजला कार्टून आणि डायनासोरची पेंटिंग अधिक आवडते
विराज सर्व प्रकारच्या पेंटिंग बनवतो, मात्र त्याला सर्वाधिक कार्टून आणि डायनासोरची पेंटिंग तयार करणे आवडते, अशी माहिती त्याची आई प्रियंका यांनी दिली. विराजने कोणाकडूनही पेंटिंगचे प्रशिक्षण घेतलेले नाही. एक वर्षाचा असताना त्याने हातात ब्रश घेतला आणि यशाचा हा प्रवास केले. आता त्याच्या कुटुंबीयांबरोबरच त्याचे शाळेतील शिक्षक देखील त्याला ‘छोटा पिकासो’ या नावाने ओळखतात.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times