पाटणा/ गोपालगंजः बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ( ) शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित करताना संरक्षणमंत्री ( defence minister rajnath singh ) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची १२०० चौरस वर्ग किलोमीटर जमीन ताब्यात घेतली, असं विरोधक सांगत आहेत. पण आपण जर खुलासा केला तर त्यांना तोंड दाखवालायीही अवघड होईल, असा इशारा राजनाथ सिंहांनी दिलाय.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहारच्या विष्णुपुरा मनेर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. “तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. १९६२ ते २०१३ दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शार्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उचांवते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, असं राजनाथ सिंह म्हणाले.

‘भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याची कुणाची हिंमत नाही’

भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करण्याची कोणत्याही देशाची हिंमत नाही. आपल्या बिहार रेजिमेंटच्या २० जवानांनी बलिदान देऊन भारत मातेच्या स्वाभिमानाची रक्षा केली आहे. ज्या मातांनी या शूर जवानांना जन्म दिला त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बलिदान देऊन ज्यांनी भारताच्या स्वाभिमानाचे रक्षण केले आहे, आज त्यांच्यामुळे जगातील कुठलाही देश भारताची एक इंच जमीनही ताब्यात घेण्याचे धाडस करू शकत नाही, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

नितीशकुमारांवर भ्रष्टाचाराचा आरोप कुणीच करू शकत नाही

राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या एका प्रचारसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं कौतुक केलं. फक्त बिहारच काय तर देशातील एकही व्यक्ती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हे काम का केले नाही किंवा हे काम का केले यावरून चर्चा होऊ शकते. पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप, कुणालाही करता येणार नाही. इतकी त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे, असं राजनाथ म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here