शारजा: सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या फलंदाजांना आपल्या तालावर चांगलेच नाचवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घालता आले. हैदरबादच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवता आले. हैदराबादच्या संदीप शर्माने यावेळी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. संदीपने यावेळी चार षटकांत २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. हैदराबादच्या टी. नटराजन आणि रशिद खान यांनीही यावेळी अचूक मारा करत आरसीबीच्या फलंदजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत.

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आरसीबीच्या संघाला त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आरसीबीच्या संघाला यावेळी दमदार सलामी मिळाली नाही. कारण जोश फिलिप आणि देवदत्त पडीक्कल यांना यावेळी १३ धावांची सलामी देता आली. कारण पडीक्कल यावेळी फ्त पाच धाा करू शकला. पडीक्कल बाद झाल्यावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आला. कोहलीला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले. संदीप शर्माने यावेळी हे दोन धक्के आरसीबीच्या संघाला दिले.

कोहली बाद झाल्यावर यावेळी फिलीप आणि एबी डिव्हिलियर्स यांची चांगली जोडी जमलेली पाहायला मिळाली. पण या जोडीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. कारण मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळी डिव्हिलियर्स बाद झाला. डिव्हिलियर्सला यावेळी २४ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २४ धावाच करता आल्या.

डिव्हिलियर्स बाद झाल्याव फिलीप जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खान यावेळी फिलीपला आपल्या तालावर चांगलेच नाचवत होता. रशिदच्या गोलंदाजीवर फिलीपने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्याला अपयश आले. फिलीपने यावेळी ३१ चेडूंत चार चौकारांच्या जोरावर ३२ धावा करता आल्या.

फिलीप बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि गुरकीरत सिंग यांनी काही काळ चांगली फलंदाजी करत आरसीबीचा धावफलक हलता ठेवण्याचे काम बजावले. सुंदरने यावेळी १८ चेंडूंत २१ धावा केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here