वाचा:
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मर्यादित स्वरूपात विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर खासगी आणि सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना तसेच वकील, खासगी सुरक्षा रक्षक आणि महिला प्रवाशांना काही अटींवर लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या सर्वांसाठीच रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.
वाचा:
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकलमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला आहे. आणि पश्चिम रेल्वेने याबाबत आज संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढवून आता २०२० करण्यात आली आहे. सध्या एकूण १४१० लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत होते. त्यात आता ६१० फेऱ्यांची भर घालण्यात आली आहे, असे रेल्वेकडून आज सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर सध्या ७०६ लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यात ३१४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०१० इतकी झाली आहे. तर मार्गावर सध्या ७०४ फेऱ्या होत असून त्यात २९६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता १००० होणार आहे. राज्यात अनलॉकचा सहावा टप्पा उद्यापासून सुरू होत असून उद्यापासूनच हा वाढीव लोकलफेऱ्यांचा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे.
वाचा:
अफवांवर विश्वास ठेऊ नका
मुंबई उपनगरीय लोकलबाबत अनेक अफवा वेळोवेळी पसरवल्या जात असतात. ती बाब ध्यानात घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. उद्या रविवारचा मेगाब्लॉक आधी जाहीर केल्यानुसार असेल व त्यानुसार लोकल धावतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्गाच्या अनुषंगाने जे वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत त्याचे प्रवाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times