पाटणाः बिहार निवडणुकीत ( ) राजकीय पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला ( ) यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला. पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या ( pakistan ) आश्रयाला जाते, असं म्हणत सुरजेवाला यांनी भाजपच्या मित्रपक्षांवरही हल्ला चढवला.

भाजपने जनतेत संभ्रम पसरवण्यासाठी तीन युती केल्या आहेत. भाजप-जेडीयू, भाजप-एलजेपी आणि भाजप-एआयएमआयएम. भाजप नेत्यांना पराभव पचवता येत नाहीए. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच भाजपला पराभवाचा दिसू लागला आहे. यामुळे पंतप्रधान, भाजप अध्यक्ष यांच्यासह सर्व भाजप नेते आपलं संतुलन आणि प्रतिष्ठा गमावून बसले आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

बिहारमधील वाढलेली बेरोजगारी, शेतकर्‍यांना पिकांची योग्य मोबदला न देणे, मुंगेर हत्याकांड या सर्व बाबींकडे भाजपाकडे उत्तर नाही. यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं देता येत नसल्याने भाजप आणि पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानच्या आश्रयामध्ये शोधत आहेत. भाजपला पराभव दिसू लागला की ते पाकिस्तानच्या आश्रयाला जातात, असं म्हणत सुरजेवाला यांनी यावेळी मोदी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here