नगर: स्वर्गीय पंतप्रधान यांना आज सर्वत्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे नाव घेतल्याशिवाय काँग्रेसचे राजकारण पुढे चालू शकत नाही, अशीच आजही परिस्थिती आहे. मात्र, आणीबाणीनंतर याच इंदिरा गांधी हतबल झालेल्या असताना त्यांचे न ऐकणारा एक वर्गही काँग्रेसमध्ये होता. त्या हतबल असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे राजकारण रंगले होते आणि ते यशस्वीही झाले होते, याची आठवण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. ( wrote about )

वाचा:

‘देह वेचावा कारणी’ हे विखे पाटील यांचे आत्मरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे. त्यात आपल्यावर तसेच इंदिरा गांधीच्या विचारांचा पगडा असल्याचे सांगताना विखे पाटील यांनी त्यांच्यावर भरभरून लिहिले आहे. कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांपैकी आपण एक असल्याचे सांगताना त्यांनी त्यावेळी राज्यात मुख्यमंत्री बदलाचे राजकारण कसे घडले यावरही प्रकाश टाकला आहे. सोबतच केंद्रीय नेतृत्व कसे असावे, ते हतबल झाले तर काय होते, याचाही परामर्श विखे पाटील यांनी घेतला आहे.

वाचा:

विखे यांनी म्हटले आहे, आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिराजी सत्तेवरून पायउतार झाल्या. सत्तेच्या महत्वाकांक्षेने गोळा झालेली नेते मंडळी दूर गेली. इंदिराजींचा पराभव सर्वसामान्यांना जिव्हारी लागला होता. ते त्यांच्याजवळ जाऊन ढसाढसा रडत. कालपर्यंत त्यांच्या बरोबरीने असलेलेच काही त्यांच्या बदनामीच्या मोहिमेत सहभागी झाले. कमजोर झालेल्या इंदिराजी आता राजकारणातून संपल्या आहेत. त्यांच्या भरवशावर पक्ष पुढे चालणार नाही, अशी मांडणी करू लागले. काँग्रेस अंतर्गत काही मंडळींनी आपला सवता सुभा निर्माण करण्यास सुरुवात केली. स्वर्णसिंग, , ब्रम्हानंद रेड्डी यांच्यासह आणखी काही जणांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. दुसरीकडे जनता सरकारमधील काही वरिष्ठ नेते इंदिराजींचा सूड घेण्यासाठी त्यांना राजकारणातून कायमच संपविण्यासाठी उतावीळ झाले होते. आणीबाणीतील त्रासाचा त्यांना वचपा काढायचा होता.

वाचा:

‘उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती बरी होती. तरीही काँग्रेसचे घर जळत असतना मी शांत कसा राहू शकतो, असे म्हणत यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात उडी घेतली. महाराष्टातील पराभवाचे खापर यांच्यावर फोडण्यासाठी असंतुष्ट मंडळींनी वसंतदादांना सक्रीय करण्याचे ठरविले. शंकररावांना जिरायत शेतकऱ्यांची बाजू घेणारे आणि बागायतदारांचे विरोधक ठरविले गेले. शंकररावांना हटविण्यासाठी वसंतदादांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू झाली. आता आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, याच भूमिकेने तेही कामाला लागले. या हालचाली सांगण्यासाठी आम्ही काही खासदार दिल्लीला गेलो. इंदिराजींना भेटलो. त्या म्हणाला, हे पहा पाटील साहेब, मी तर पराजित झाले. राजकारणात कमजोर झाले. माझे कुणी ऐकणार नाही. लोक सत्तेच्या मागे असतात. नंतर आम्ही यशवंतरावांनाही भेटलो. पण तेही शंकररावांवर नाराज होते. शेवटी बऱ्याच घडामोडी होत १७ एप्रिल १९७७ ला वसंतदादा मुख्यमंत्री झाले. काँग्रेसमधील गटबाजी वाढीस लागली. जनतेची कामे करण्यापेक्षा मुख्यमंत्र्याचा दरबार सांभाळला की झाले, अशीच स्थिती निर्माण झाली होती. आम्ही पुन्हा इंदिराजींना भेटालया गेलो. त्या म्हणाल्या मी काही करू शकत नाही. तुमच्या पातळीवर जे करता येईल ते करा. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. आमचा हा प्रयोगही यशस्वी झाला नाही’, असे विखेंनी म्हटले आहे.

वाचा:

केंद्रीय नेतृत्व देश आणि समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. केंद्रीय नेतृत्व कमजोर झाले तर काय परिणाम होतात, याचे हे उदाहरण होते. आता अनेक विद्वान इंदिराजींवर गौरवपर लिहू लागले आहेत. भारतातल्या त्यावेळी द्वेषमूलक टीका करणाऱ्या पत्रकारांनी, नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी नंतर साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल खूप लिहिले. इंदर मल्होत्रा या पत्रकारानं इंदिराजींच्या चरित्रात आणीबाणीवर खोचक टीका केली होती. मतपरिवर्तन होऊन २००६ मध्ये त्यांनी पुन्हा चरित्र लिहिले. त्यात इंदिराजींचे यथास्थित सकारात्मक मूल्यमापन आहे. ते नव्या पिढीने वाचण्यासारखे आहे. नंतर इंदिराजींना सगळ्यात जास्त मदत सरकारी अधिकाऱ्यांनी केली. खरोखरच ती आर्यन लेडी होती, असे विखेंनी नमूद केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here