पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( ) दुसर्‍या टप्प्यासाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे त्यासाठी जोरात प्रचार सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) देखील निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi rally ) यांच्या आज झटपट प्रचारसभा आयोजित करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ नोव्हेंबरला बिहारमध्ये चार प्रचारभा घेणार आहेत. आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार पंतप्रदान मोदी हे तीन सभा घेणार होते. या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदींना छपरा, समस्तीपूर आणि मोतिहारी येथे सभा घेणार होते. पण आता ते आणखी एक सभा घेणार आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर मिळालेया माहितीवर पंतप्रधान मोदींची बगाहामध्ये एक सभा प्रस्तावित असल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदींची पहिली सभा छपरामध्ये होणार आहे. यानंतर समस्तीपूरमध्ये सकाळी ११.३० वाजता आणि दुपारी १ वाजता मोतिहारी येथे मोदींच्या सभा होतील. मोदींची शेवटती सभा दुपारी ३ वाजता बगाहा इथं होईल.

पहिले हे २३ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर या प्रत्येक दिवशी तीन सभा घेणार होते. आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमात थोडा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदी आज १ नोव्हेंबरला चार जाहीर सभा घेतील. त्याचबरोबर ३ नोव्हेंबरला त्यांच्या दोन सभा होणार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार हे चार दिवसांच्या पहिल्या आणि तिसर्‍या बैठकीत पंतप्रधान मोदींसमवेत स्टेज सामायिक करणार होते, पण 3 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या दोनच बैठका आहेत.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला मतदान झालं आहे. आता दुसर्‍या टप्प्यातील जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here