पोलीस अधिकारी जाधव हे रात्रगस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की दत्तू सकट याने आपल्या घरात व वाहनात विनापरवाना बेकायदा दोन घातक लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या आहेत. त्यानंतर जाधव यांनी तत्काळ त्यांच्याकडील पोलीस पथक बोलावून टाकळी गावात वस्तीवर जाऊन सकट याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घराची आणि दारासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीची (एमएच १६ आर ४१३३) झडती घेतली. यावेळी गाडीमध्ये एक लोखंडी तलवार आणि एक नारंगी रंगाचा अंबर दिवा असा मुद्देमाल मिळाला. तर आरोपी सकट याच्या घरामध्येही एक तलवार मिळून आली आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी दत्तू सकट यास अटक केली आहे. तसेच आरोपीच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्यासह त्यांच्या पथकातील गौतम फुंदे, केशव व्हरकटे, हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, संतोष साबळे, मच्छीद्र जाधव, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे यांनी ही कारवाई केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times