शारजा: सनरायझर्स हैदराबादच्या संघाने शनिवारच्या सामन्यात आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुणांची कमाई केली आहे. या दोन गुणांसह हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हैदराबादने आपले या स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे.

आजच्या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. या लढतीपूर्वी हैदराबादच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानावर होता. पण आजच्या १३व्या सामन्यात हैदराबादच्या संघाने विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांना दोन गुणही पटकावता आले. या दोन गुणांसह हैदराबादचे आता १२ गुण झाले आहे. त्यामुळे हैदराबादने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हैदराबादचे या स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला आज पराभव पत्करावा लागला. आजच्या लढतीपूर्वी आरसीबीचा संघ १२ सामने खेळला होता. या १२ सामन्यांमध्ये आरसीबीने सात विजय मिळवले होते, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आजच्या १३व्या सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आरसीबीचे आता १४ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. आरसीबीचा अजून एक सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकून आरसीबीचा संघ १६ गुण मिळवू शकतो आणि प्ले-ऑफसाठी आपले दावेदारी सांगू शकतो. पण या सामन्यात जर आरसीबीला पराभव पत्करावा लागला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आरसीबीसाठी आता १४वा सामना सर्वात महत्वाचा असेल.

गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याचबरोबर दुसरे स्थान आरसीबीने कायम राखले आहे. गुणतालिकेत तिसरे स्थान दिल्ली कॅपिटल्सकडे आहे. पण चौथ्या स्थानावर मात्र आज हैदराबादच्या संघाने कब्जा केल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here