कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.१५ मिनिटांनी कृषीमंत्री आर. दोराइकन्नू यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाचा : वाचा :
कृषिमंत्री आर दोराइकन्नू तंजावूर जिल्ह्याच्या पापनासम विधानसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आले होते.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपलं दु:ख व्यक्त करताना, ‘आर दोराइकन्नू हे त्यांच्या साधेपणा, नम्रता, शासन कौशल्य आणि शेतकरी समुदायाच्या हितासाठी वचनबद्धतेसाठी परिचित होते. त्यांनी कृषी मंत्रालयाला पूर्ण समर्पणभावानं हाताळलं. दोराइकन्नू यांच्या अकाली निधनानं तामिळ जनतेचं न भरून येणारं नुकसान झालंय’ असं म्हणत आर दोराइकन्नू यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times