म. टा. प्रतिनिधी, : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे करून बलात्कार करणाऱ्या चौथ्या आरोपीला गजाआड करून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व काळ्या रंगाची कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वाहनाचा गुन्ह्यात आरोपींनी कशा पद्धतीने वापर केला याबाबत पोलिस तपास करीत असून गुन्ह्यात पाचवा आरोपी असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपींमध्ये अविनाश रवींद्र फरतडे (वय ३४, रा. बोपगाव, ता. पुरंदर), सोमनाथ भिकाजी गायकवाड (वय ३४, रा. वडकी, ता. हवेली), निखिल पांडुदा शिंदे (वय २९) आणि सुनील नवनाथ शिंदे (वय २० दोघे रा. वैदूवाडी, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. पाचव्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

हडपसर येथील पीडित पंधरा वर्षांची मुलगी तीन महिन्यांपूर्वी कुटुंबासह पुण्यात वास्तव्याला आली होती. २६ ऑक्टोबर रोजी तिचा आईसोबत किरकोळ वाद झाल्याने ती परत गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडली. परंतु, मुलगी घरी न आल्याने आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती न सापडल्याने दुसऱ्या दिवशी तिचे अपहरण झाल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांनी सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संबंधित मुलगी सापडली. मुलगी घरातून निघाल्यानंतर गावाकडे जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होती. तेव्हा गाडीतळ येथे तीने एका रिक्षाचालकाला संपर्क केला. तिथून पीडित मुलीला बोलण्यात गुंतवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांनी सासवड पोलिस ठाणे येथे संबंधित मुलगी सापडली. चौघे आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचे नव्हते. तिला गावाकडे जायचे असल्याने, कोठून तरी मदत मिळेल का, या आशेने ती गाडीतळ परिसरात आली होती. त्यामुळे आरोपींनी तिला गावाकडे सोडतो, असे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केला. पीडितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here